नियमावली | श्री स्वामी समर्थ दाल मिल
सेवा नियम व अटी
श्री स्वामी समर्थ दाल मिल बामणी फाटा येथील प्रक्रिया, वजनकाटा, कोंढा उचल व बिल नियमावली.
सेवा नियमावली व शर्ती
ताजी माहिती: २२ ऑगस्ट २०२६
१. प्रक्रिया फी आणि वजन मोजणी नियम
प्रक्रिया फी चालू दरानुसार प्रति क्विंटल (₹ 600 / क्विंटल) कच्च्या मालाच्या एकूण वजनावर आकारली जाते.
२. ओलावा मर्यादा
धान्यात १२% ते १४% दरम्यान ओलावा असणे उत्तम असते. ओलावा १४% पेक्षा जास्त असल्यास दाळ उताऱ्यावर परिणाम होऊ नये म्हणून माल वाळवून प्रक्रिया केली जाते.
३. कोंढा उचल मुदत
प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज आल्यावर १५ दिवसांच्या आत स्वतःचा कोंढा घेऊन जाणे आवश्यक आहे. अन्यथा मिलच्या चालू दराने बिलात हिशोब केला जाईल.
४. डिलिव्हरी व गेटपास पावती
तयार दाळ किंवा कोंढा ताब्यात घेताना कॉम्प्युटराइज्ड गेटपास आणि बिल चुकता पावती दाखवणे आवश्यक आहे.
